Monday, April 1, 2024

देशाचे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी घोषित केलेल्या "लखपती दीदी योजना" अंतर्गत सुमारे 2 कोटी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास योजना तयार करण्यात आली असून, त्याद्वारे त्यांना विविध क्षेत्रात विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, जेणेकरून महिला व मुली घरातूनच सूक्ष्म उद्योग सुरू करून लखपती होऊ शकतील व त्या देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकतील आणि स्वतःला आणि आपल्या कुटुंबाला मुख्य प्रवाहात जोडू शकतील, स्वावलंबी व आत्मनिर्भर होऊ शकतील.

या योजनेचा लाभ अधिक हुण अधिक जैन महिलांना मिळावा या हेतूने भाजपा जैन प्रकोष्ट, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने लोकनेते देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संदीप भंडारी यांच्या संकल्पनेतून राज्यभरात १०० "नवकार जैन महिला बचत गट" स्थापन करण्यात येत आहे, ज्या माध्यमातून किमान 2000 जैन महिलांना प्रशिक्षित व रोजगार उपलब्ध करून देत त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्याचे उद्दिष्ट आहे.

संदीप भंडारी, प्रदेश अध्यक्ष 
भाजपा जैन प्रकोष्ठ, महाराष्ट्र प्रदेश

No comments:

Post a Comment